संतापजनक; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक समोर आली आहे. एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. तब्बल १८ दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना यवतमाळमधील उमरखेड तालुक्यातील कांचीपुरा येथे घडली असून या प्रकरणातील आरोपी हा फरार आहे. शेख नजीर शेख उस्मान (वय ५० वर्षे) […]

संतापजनक; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक समोर आली आहे. एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. तब्बल १८ दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना यवतमाळमधील उमरखेड तालुक्यातील कांचीपुरा येथे घडली असून या प्रकरणातील आरोपी हा फरार आहे. शेख नजीर शेख उस्मान (वय ५० वर्षे) असं संशयित आरोपीचे नाव आहे. उमरखेड शहरातील कांचीपुरा येथील शेख नजीर शेख उस्मान याचा दूध व्यवसाय आहे. त्यांच्या गोठ्यात २० ते २५ म्हशी आहेत. त्यामुळं तो दररोज गोठ्यातच असायचा. पीडित मुलगी दूध आणण्याकरिता शेख नजीर शेख उस्मानच्या गोठ्यात गेली असता त्याने आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे प्रकरण मंगळवारी उघडकीस आल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. काही तरुणांच्या जमाव रात्रीच्या सुमारास शेख नजीर शेख उस्मान यांच्या घरावर चाल करून गेला होता. अशी चर्चा शहरात सुरू आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी बुधवारी, २६ मे रोजी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आरोपीला तातडीने अटक करावी, अशी मागणी केली आहे. तसेच कांचीपुरामधील नागरिकांनी देखील या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर जमाव केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे यांनी आरोपींना तात्काळ अटक करू, असे आश्वासन दिल्याने जमाव शांत झाला. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी शोध सुरू आहे. तसेच एमआयएमचे नगरसेवक अफसरभाई जलील कुरेशी यांनी देखील आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number