समृद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. इथेनॉलने भरलेल्या टँकरने भरधाव वेगात पुढे जाणाऱ्या कारला मागून जोरदार धडक दिली. ही घटना वर्ध्याच्या विरुद्ध जवळ येथे घडली असून इथेनॉलच्या टँकरच्या धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की, कारने काही क्षणांतच पेट घेतला. या जळत्या कारमध्ये पाच जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मृत सर्वजण वर्धा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार, या भीषण दुर्घटनेत सालोड येथील राजेश टिपले, पत्नी सुषमा टिपले, मुलगी जानवी टिपले आणि चालक अंकुश राऊत यांचा जागीच मृत्यू झालाय. हे कुटुंब मुलीचे पुण्यात कॉलेजमध्ये प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून वर्ध्याकडे परत येत होते. अपघातात आयशर ट्रकमधील संजय कुमार आणि समरजीत पाल यांचा मृत्यू आहे.
या अपघातामुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ज्यामुळे अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. यावेळी महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत अपघाताचे नेमके कारण आणि टँकर चालकाची भूमिका याचा तपास सुरू केला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.