Shiv Sena Corporator Resignation : शिवसेनेला धक्का! नवी मुंबईच्या 5 नगरसेवकांचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द; लवकरच शिंदेंनाही भेटणार

नवी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे दुसऱ्या पक्षात स्थलांतर, पद रद्द अशा घटना घडत असतानाचा आता शिवसेना शिंदे गटालाही मोठा धक्का मिळाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. नवी मुंबईतील राजकारणात खळबळ माजवणारी ही घटना असल्याचे बोलले जात आहे. तुर्भे डम्पिंग ग्राउंड येथे नवी मुंबई मनपातर्फे वेस्ट टू एनर्जी हा […]

Shiv Sena Corporator Resignation : शिवसेनेला धक्का! नवी मुंबईच्या 5 नगरसेवकांचा राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द; लवकरच शिंदेंनाही भेटणार

नवी मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे दुसऱ्या पक्षात स्थलांतर, पद रद्द अशा घटना घडत असतानाचा आता शिवसेना शिंदे गटालाही मोठा धक्का मिळाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. नवी मुंबईतील राजकारणात खळबळ माजवणारी ही घटना असल्याचे बोलले जात आहे. तुर्भे डम्पिंग ग्राउंड येथे नवी मुंबई मनपातर्फे वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प राबविण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध असतानादेखील सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली नागरिकांचा विरोध डावलून हा प्रकल्प रबविण्याचा घाट घालण्यात येत आहे. यामुळे नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांसमोर न झुकता स्थानिकांच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय देत राजीनामे दिले आहेत. दरम्यान, पुढील आठवड्यात मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळाली असून त्यांची भेट घेऊन आम्ही पुढील दिशा ठरवू, अशी प्रतिक्रिया राजीनामा देणाऱ्यांपैकी एक शिवसेना नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी दिली आहे. 

हेही वाचा : Maharashtra Farmer Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण! 6 लाख 22 हजार शेतकरी कर्जमुक्त; 12 लाख शेतकरी अजूनही वंचित, कारण काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number