कोकणाला ओखीचा तडाखा; रायगडमध्ये 4 बोटींसह 26 मच्छीमार बेपत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड   कोकणाला ओखीचा तडाखा बसला आहे. रायगडमधील दिघी गावातल्या 4 बोटींसह 26 मच्छीमार बेपत्ता आहेत. या चारही बोटी 25 नॉटिकल आत गेल्याची माहिती मिळतेय. अचानक ओखीनं तडाखा दिल्यानं समुद्रामध्ये अडकलेल्या बोटींवरील खलाशांसह कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.  रायगड जिल्ह्यातील 250 मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारी साठी गेल्या होत्या. त्यापैकी 221 बोटी सुखरूप […]

कोकणाला ओखीचा तडाखा; रायगडमध्ये 4 बोटींसह 26 मच्छीमार बेपत्ता

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

 

कोकणाला ओखीचा तडाखा बसला आहे. रायगडमधील दिघी गावातल्या 4 बोटींसह 26 मच्छीमार बेपत्ता आहेत. या चारही बोटी 25 नॉटिकल आत गेल्याची माहिती मिळतेय.

अचानक ओखीनं तडाखा दिल्यानं समुद्रामध्ये अडकलेल्या बोटींवरील खलाशांसह कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.

 रायगड जिल्ह्यातील 250 मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारी साठी गेल्या होत्या. त्यापैकी 221 बोटी सुखरूप परत आल्या.

मुंबई ते मांडवा , तसंच रेवस ते भाऊचा धक्का ही जलवाहतूक आजपासून बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. तसेच मच्छिमारांनी आता समुद्रात उतरू नये, असा इशारा प्रशासनानं दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number