शेतकऱ्यांपाठोपाठ मच्छीमारांचीही कर्जमाफीची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जात बुडालेल्या मच्छीमारांनाही कर्जमाफी देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं केली आहे.   यासंदर्भात आज मस्त्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासोबत कृती समितीची बैठक होणार आहे.   या बैठकीनंतरच्या एका महिन्यात ठोस निर्णय झाला नाही तर जुलै महिन्यात गिरगाव चौपाटीवरून मंत्रालयपर्यंत लाँग मार्च काढण्याचा इशारा समितीनं दिला.   मंगळवारी पत्रकार […]

शेतकऱ्यांपाठोपाठ मच्छीमारांचीही कर्जमाफीची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जात बुडालेल्या मच्छीमारांनाही कर्जमाफी देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं केली आहे.

 

यासंदर्भात आज मस्त्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासोबत कृती समितीची बैठक होणार आहे.

 

या बैठकीनंतरच्या एका महिन्यात ठोस निर्णय झाला नाही तर जुलै महिन्यात गिरगाव चौपाटीवरून मंत्रालयपर्यंत लाँग मार्च काढण्याचा इशारा समितीनं दिला.

 

मंगळवारी पत्रकार भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत समितीने ही माहिती दिली. मच्छीमारांना कर्जमाफी देण्यात सरकार सकारात्मक दिसत आहे. तरीही सरकारने

वेळकाढूपणा करू नये असं समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी म्हटले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number