चीनमध्ये आता आणखी एका आजाराने डोकं वर काढलं

बीजिंग: जगात कोरोनाचा थैमान सुरूच आहे आता यातचं एक चीनमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. चीनमध्ये आता आणखी एका आजाराने डोकं वर काढलं आहे. देशात H10N3 बर्ड फ्लूचा (H10N3 bird flu) पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जगात आणखी चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. या आजाराबद्दल चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (China’s National Health Commission) माहिती दिली […]

चीनमध्ये आता आणखी एका आजाराने डोकं वर काढलं

बीजिंग: जगात कोरोनाचा थैमान सुरूच आहे आता यातचं एक चीनमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. चीनमध्ये आता आणखी एका आजाराने डोकं वर काढलं आहे. देशात H10N3 बर्ड फ्लूचा (H10N3 bird flu) पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जगात आणखी चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. या आजाराबद्दल चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (China’s National Health Commission) माहिती दिली आहे. तसेच माणसामध्ये पहिल्यांदाच H10N3 हा व्हायरस दिसून आला आहे. चीनमधील पूर्व प्रांतात राहणाऱ्या जियांग्सू नावाच्या व्यक्तीला ( वय 41) H10N3 या बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची लागण झाली आहे. H10N3 हा माणसामध्ये आढळेला हा पहिला रुग्ण असून हा रुग्ण झेनजियांगचा (Zhenjiang) रहिवाशी आहे. या रुग्णाला ताप आला होता, शिवाय त्याला बाकी इतर लक्षणंही दिसत होती. 28 एप्रिलला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर 28 मे रोजी या व्यक्तीला H10N3 एव्हिएन इन्फ्लुएंझा व्हायरसची (H10N3 avian influenza) लागण झाल्याचं निदान झालं. अशी माहिती NHC ने दिली आहे. या व्यक्तीला या व्हायरसची लागण कशी झाली याची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. पण हा आजार फार गंभीर नसून व्यापक स्तरावर तो पसरण्याचा किंवा मोठ्या प्रमाणात त्याचा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी आहे, असंही एनएचसीने सांगितलं आहे. या रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्चही देण्यात आला आहे. एव्हिएन इन्फ्लुएंझाचे चीनमध्ये वेगवेगळे स्ट्रेन आहेत. त्यापैकी काही माणसांमध्ये पसरतात. विशेषतः कुक्कुटपालन व्यवसायाशी संबंधित असलेल्यांमध्ये हा आजार पसरतो. चीनमध्ये 2016-2017 साली बर्ड फ्ल्यूच्या H7N9 स्ट्रेननं थैमान घातलं होतं. तेव्हा जवळपास 300लोकांचे प्राण गेले होते. आता चीनमध्ये नुकत्याच आढळलेल्या H10N3 या इन्फेक्सनचे याआधी जगात एकाही प्रकरणाची नोंद नाही, असंही चीनच्या आरोग्य आयोगाने सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number