पिंपरी-चिंचवड: किरकोळ वादातून एकावर गोळीबार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये किरकोळ वादातून एकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे सोमवारी रात्री घडला. सुत्रांच्या माहितीनुसार, जयवंत चितळकर त्याच्या मित्रांसोबत वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात बसला होता. त्याने त्याची दुचाकी रस्त्यात पार्क केली होती. रस्त्याने जात असलेल्या एका कारला त्या दुचाकीमुळे अडचण येत होती. कार चालकाने दुचाकी […]

पिंपरी-चिंचवड: किरकोळ वादातून एकावर गोळीबार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये किरकोळ वादातून एकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथे सोमवारी रात्री घडला.

सुत्रांच्या माहितीनुसार, जयवंत चितळकर त्याच्या मित्रांसोबत वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात बसला होता. त्याने त्याची दुचाकी रस्त्यात पार्क केली होती. रस्त्याने जात असलेल्या एका कारला त्या दुचाकीमुळे अडचण येत होती. कार चालकाने दुचाकी काढण्यास सांगितले. त्यावरून त्या दोघांत किरकोळ भांडणे झाली. त्यानंतर कारचालक निघून गेला. मात्र थोड्यावेळाने कारचालक त्याच्या मित्रांसह शिवाजी चौकात आला आणि त्याने चितळकर सोबत भांडण केले. त्यावेळी एकाने चितळकर याच्यावर गोळीबार केला. दोन गोळ्या लागल्याने जखमी असणाऱ्या चितळकर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number