भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद भागात भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हरियाणाची नंबर प्लेट असलेल्या चारचाकीमधून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रशेखर यांच्यावर ४ राऊंड फायर केले. आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तरप्रदेश मधील देवबंद येथे गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला. काही अज्ञातांकडून चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक […]

भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद भागात भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हरियाणाची नंबर प्लेट असलेल्या चारचाकीमधून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रशेखर यांच्यावर ४ राऊंड फायर केले. आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तरप्रदेश मधील देवबंद येथे गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला.

काही अज्ञातांकडून चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर गोळीबार केला. आझाद यांच्या कमरेजवळून एक गोळी चाटून गेली. चारचाकीच्या काचाही फुटल्या आहेत. गोळीबारानंतर चंद्रशेखर आझाद यांना उपचारासाठी तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यावर महाराष्ट्राचे आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील वाकेकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रियांमध्ये त्यांनी चंद्रशेखर आझाद यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी राष्ट्रपती आणि केंद्र सरकारकडे केली आहे. रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. हल्लेखोरांना अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number