चेंबूरच्या आर. के. स्टुडिओला आग; आगीत दोन स्टुडिओ जळून खाक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. स्टुडिओतल्या इलेक्ट्रिक साहित्याचे आग लागल्यामुळे नुकसानव झाले आहे. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या आर. के. स्टुडिओमध्ये दाखल झाल्या होत्या. या घटनेमध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळते आहे.   आर. के. स्टुडिओमध्ये […]

चेंबूरच्या आर. के. स्टुडिओला आग; आगीत दोन स्टुडिओ जळून खाक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागली होती. स्टुडिओतल्या इलेक्ट्रिक साहित्याचे आग लागल्यामुळे नुकसानव झाले आहे. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या आर. के. स्टुडिओमध्ये दाखल झाल्या होत्या. या घटनेमध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळते आहे.

 

आर. के. स्टुडिओमध्ये एकूण 8 स्टुडिओ होते. यापैकी स्टुडिओ 1 आणि 2 पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. स्टुडिओ 7चेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. आज या स्टुडिओमध्ये कोणत्याही चित्रपटाचे किंवा सिरिअलचे चित्रिकरण चालू नसल्यामुळे काही प्रमाणात धोका टळला असल्याची माहिती आहे.

 

4 रुग्णवाहिका, 5 वॉटरटॅंक, 7 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही आग विझविण्यासाठी दीड ते दोन तास लागले. ही आग कशामुळे लागली हे अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही, परंतु शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number