एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग

दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. दरम्यान, आग लागल्यावर अतिदक्षता विभाग बंद करण्यात आला होता आणि रुग्णांना त्वरीत हलवण्यात आले होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक […]

एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग
दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. दरम्यान, आग लागल्यावर अतिदक्षता विभाग बंद करण्यात आला होता आणि रुग्णांना त्वरीत हलवण्यात आले होते. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात इलेक्ट्रिकचे काम सुरू आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आणि याच रुग्णालयात माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली सध्या उपचार घेत आहेत. अरूण जेटली यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number