अरमान कोहली विरोधात गुन्हा दाखल, गर्लफ्रेंडला केली मारहाण…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई जानी दुश्मन फेम ‘अरमान कोहली’च्या विरोधात मारहाण प्रकरणाबाबत सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘अरमान’ने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण त्याला या क्षेत्रात हव तसं यश मिळाल नाही. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी अरमान ‘बिग बॉस’ कार्यक्रमामध्ये आला आणि ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतर अरमानला जास्त प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना […]

अरमान कोहली विरोधात गुन्हा दाखल, गर्लफ्रेंडला केली मारहाण…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जानी दुश्मन फेम ‘अरमान कोहली’च्या विरोधात मारहाण प्रकरणाबाबत सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘अरमान’ने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण त्याला या क्षेत्रात हव तसं यश मिळाल नाही. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी अरमान ‘बिग बॉस’ कार्यक्रमामध्ये आला आणि ‘बिग बॉस’मध्ये आल्यानंतर अरमानला जास्त प्रसिद्धी मिळाली.

बिग बॉसच्या घरात असताना अरमानचे प्रेमप्रकरण तनिषा मुखर्जीसोबत सुरु होते मात्र नतंर त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर अरमानच्या आयुष्यात ‘नीरू रंधावा’ आली अरमान आणि नीरूच्या प्रेमप्रकरणाची चर्चा कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र नुकताच नीरूने अरमानच्या विरोधात सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सांताक्रूझमधील आपल्या राहत्या घरी रविवारी दुपारी अरमानने रागाच्या भरात नीरूला मारहाण केली असल्याची तक्रार नीरूने नोंदवली आहे. या मारहाणीत नीरूच्या डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून नीरूला ‘कोकिळाबेन’ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number