आर्थिक वर्षाला सुरुवात; देशात अनेक मोठे बदल होणार

आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून नवीन कर वर्ष सुरू होत आहे. दर महिन्याप्रमाणे, महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात अनेक मोठे बदल?

आर्थिक वर्षाला सुरुवात; देशात अनेक मोठे बदल होणार

आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस, उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून नवीन कर वर्ष सुरू होत आहे. दर महिन्याप्रमाणे, महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात अनेक मोठे बदल देखील लागू केले जातील, ज्याची झळ प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक सर्वसामान्याच्या खिशाला बसू शकते. हे बदल एलपीजी सिलिंडर, तुमचे बँक खाते, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या किमतींमध्ये दिसून येतील. इतकेच नाही तर महामार्गावरून प्रवास करणे महाग होऊ शकते, कारण अनेक मार्गांवर टोल कर वाढणार आहे.

हेही वाचा: चलन न भरल्यास मोठी कारवाई

जगणं महागणार ? 
एलपीजीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
सीएनजी-पीएनजी आणि एटीएफच्या किंमती वाढणार
युपीआय आयडीच्या सेवा बंद होण्याची शक्यता
डेबिट कार्डसाठी नवे नियम लागू होणार
युनिफाइड पेन्शन स्कीम संदर्भातील नियम बदलणार
कर स्लॅबशी संबंधित नियम बदलणार
टीडीएस मर्यादेत वाढ होण्याची शक्यता
क्रेडीट कार्डशी संबंधित नियम बदलण्याची शक्यता
बँक खात्याशी संबंधित बदल केले जाऊ शकतात
महामार्ग टोलमध्येही वाढ होण्याची शक्यता

दरम्यान मंगळवारपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. देशात अनेक मोठे बदल होणार असून सर्वसामान्याच्या खिशाला झळ बसणार असल्याचं बोललं जातंय. घरगुती गॅस, बँक खातं, डेबिट, क्रेडीट कार्ड किंमतींमध्ये बदलमहामार्गावरून प्रवास करणेही महागणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number