मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचे दुखणे पुन्हा बळावले असून मागील आठवड्यापासून मुख्यमंत्र्यांना मानेचा त्रास सुरू झाला आहे. तसेच त्यांच्या मणक्यातही वेदना होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्पॉन्डीलिसच्या दुखण्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मुंबईच्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक चाचण्या होऊन मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया होणार आहे.
पंढरपूरमधील पालखी मार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. मात्र पंढरपूरच्या या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा लावलेला दिसला. मुख्यमंत्र्यांना मागील काही दिवसांपासूनच मणका आणि मानेचा त्रास जाणवू लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मणक्याच्या त्रासाने त्रस्त झाले असल्यामुले त्यांना मुंबईतील एच. एन. रिलायन्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक चाचण्या होऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.