अखेर आर्यन खान तुरुगांबाहेर, ‘मन्नत’वर चाहत्यांची गर्दी

  क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला, मात्र जामीनसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे उशीरा पोहचल्यामुळे आर्यनला कालची रात्रसुद्धा तुरुंगातच काढावी लागली. आणि अखेर आज आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे.  ऑर्थर रोड तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आज जामीन पेटी उघडली. आणि त्यानंतर सकाळी ९ वा. आर्यनच्या जामीनप्रक्रियेला सुरुवात झाली. आणि अखेर […]

अखेर आर्यन खान तुरुगांबाहेर, ‘मन्नत’वर चाहत्यांची गर्दी

  क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर केला, मात्र जामीनसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे उशीरा पोहचल्यामुळे आर्यनला कालची रात्रसुद्धा तुरुंगातच काढावी लागली. आणि अखेर आज आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे.

 ऑर्थर रोड तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आज जामीन पेटी उघडली. आणि त्यानंतर सकाळी ९ वा. आर्यनच्या जामीनप्रक्रियेला सुरुवात झाली. आणि अखेर सकाळी ११ वा.च्या सुमारास आर्यन खान तुरुंगात बाहेर आला. आर्यनची तुरुंगातून सुटका झाल्यामुळे शाहरुखच्या निवासस्थानी जल्लोषाचे वातावरण आहे. शाहरुख खानच्या अनेक चाहत्यांनी तसेच आर्यनच्या मित्रपरिवांनी ‘मन्नत’जवळ गर्दी केली आहे.

  क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन गेल्या २६ दिवसांपासून अटकेत होता. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आर्यनची सशर्त जामीन मंजूर करण्यात आली. आर्यनच्या जामीन अर्जावरील निकालाच्या प्रतवर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला न्यायालयात आर्यनची जामीनदार म्हणून दाखल झाली होती. मात्र जामीनसंबंधी महत्त्वाची कागदपत्रे उशीरा पोहचल्यामुळे काल आर्यनची तुरुंगातून सुटका झाली नाही. आज सकाळी आर्यनच्या जामीन प्रक्रिया पूर्ण होऊन आर्यन तुरुंगातून बाहेर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number