मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात काल पार पडलेल्या मनसेच्या उत्तरसभेत तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेची उत्तरसभा पार पडली. या सभेत भाषणापूर्वी राज ठाकरे यांनी भाषणापूर्वी तलवार म्यानातून काढून दाखवली होती. या कारणामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय हत्यार कायदा १९५९चे कलम ४ व ५ नुसार ठाणे नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
राज ठाकरे यांची मंगळवारी ठाण्यात पार पडलेल्या सभेत त्यांनी मविआवर निशाणा साधला. राज ठाकरेंची सभेची चांगलीच चर्चा झाली असून त्यांच्या सभेनंतर राज्यात अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.