कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

छत्तीसगडमधील रायपूरमध्ये धार्मिक कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात अपशब्द वापरले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर कालीचरण महाराजांवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. अकोला जिल्ह्यात काँग्रेसच्या नेत्यांनी […]

कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

छत्तीसगडमधील रायपूरमध्ये धार्मिक कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात अपशब्द वापरले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर कालीचरण महाराजांवर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. अकोला जिल्ह्यात काँग्रेसच्या नेत्यांनी कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन पुकारले होते. तसेच काँग्रेस नेत्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी कालीचरण महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महाराजांवर २९४ आणि ५०५ या कलमांतर्गत कारवाई होणार आहे.

कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्या विरोदात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच महात्मा गांधी यांना मारणाऱ्या नथुराम गोडसेला त्यांनी नमस्कार केला. त्यामुळे कालीचरण महाराजांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटले असून काँग्रेस नेत्यांनी आंदोलन पुकारले.

मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तर अधिवेशनादरम्यान विजय वडेट्टीवार, नाना पटोले, नवा मलिक या मंत्र्यांनीही कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आणि अखेर काँग्रेसच्या आंदोलनानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number