FIH Women’s Nations Cup 2025-26: सलामीच्या सामन्यात भारताची जोरदार मुसंडी; अमेरिकेचा 3-2 ने पराभव

भारतीय हॉकी संघाने सोमवारी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या पूल 'अ' मधील आपल्या सलामीच्या सामन्यात, दोन गोलने पिछाडीवर असताना उल्लेखनीय पुनरागमन करत अमेरिकेला 3-2 ने हरवून आपल्या एफआयएच महिला नेशन्स कप 2025-26 मोहिमेची सुरुवात केली. हॉकी क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतासाठी, दीपिकाने (17', 24') दोन गोल केले, तर नवनीत कौरने (28') विजयी गोल केला. नॉर्थ हार्बर […]

FIH Women’s Nations Cup 2025-26: सलामीच्या सामन्यात भारताची जोरदार मुसंडी; अमेरिकेचा 3-2 ने पराभव

भारतीय हॉकी संघाने सोमवारी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या पूल 'अ' मधील आपल्या सलामीच्या सामन्यात, दोन गोलने पिछाडीवर असताना उल्लेखनीय पुनरागमन करत अमेरिकेला 3-2 ने हरवून आपल्या एफआयएच महिला नेशन्स कप 2025-26 मोहिमेची सुरुवात केली. हॉकी क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतासाठी, दीपिकाने (17', 24') दोन गोल केले, तर नवनीत कौरने (28') विजयी गोल केला. नॉर्थ हार्बर नॅशनल हॉकी सेंटर येथे झालेल्या या सामन्यात, जागतिक क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेसाठी ॲश्ले सेसा (4') आणि मॅडेलिन झिमर (7') यांनी गोल नोंदवले.

हेही वाचा : India vs Pakistan Fight Video : भारत-पाकिस्तान T20 सामन्यादरम्यान महिला खेळाडू भिडल्या?; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओचं सत्य

अमेरिकेने सामन्याची दमदार सुरुवात केली. चौथ्या मिनिटाला ॲशली सेसाने 'फील्ड गोल' करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत मॅडलिन झिमरने 'पेनल्टी कॉर्नर'चे गोलमध्ये रूपांतर करून अमेरिकेची आघाडी दुप्पट केली. तसेच भारतावर सुरुवातीलाच दडपण निर्माण केले. दोन गोलने पिछाडीवर असतानाही भारताने हळूहळू आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सत्रात (क्वार्टरमध्ये) त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. 'ड्रॅग-फ्लिक' साठी लोकप्रिय दीपिकाने 'पेनल्टी कॉर्नर'वर यशस्वी गोल करत गोलमधील अंतर कमी केले. तर भारताला सामन्यात परत आणले. सामन्याची सूत्रे भारताच्या बाजूने झुकली. त्यांना याच सत्राच्या मध्यावर आणखी एक 'पेनल्टी कॉर्नर' मिळाला. यावेळी पुन्हा एकदा दीपिकाने पुढाकार घेत 'पेनल्टी कॉर्नर'चे यशस्वी गोलमध्ये रूपांतर केले. यासोबतच धावसंख्या 2-2 अशी बरोबरीवर आणली.

भारताने आपला दबाव कायम राखत मध्यंतरापूर्वीच सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. नवनीत कौरने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून संघाला सामन्यात पहिल्यांदाच आघाडी मिळवून दिली. तर संघ 3-2 अशा आघाडीसह विश्रांतीसाठी गेला. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्याच्या उद्देशाने जोरदार संघर्ष केला. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु उर्वरित दोन सत्रांमध्ये कोणत्याही बचावफळीने प्रतिस्पर्ध्याला आणखी गोल करण्याची संधी दिली नाही. परिणामी, भारताने आपली आघाडी टिकवून ठेवली आणि एफआयएच (FIH) नेशन्स कपमधील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. या विजयामुळे भारत 'पूल अ' मध्ये तीन गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. जपानचेही तीनच गुण आहेत. परंतु गोल फरकाच्या आधारे ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. एफआयएच नेशन्स कपमधील आपल्या पुढील सामन्यात भारताचा सामना मंगळवारी जपानशी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number