विरार लोकलमध्ये चौथ्या सीटवरून प्रवाशाला चोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये मारहाणीचे प्रकार नेहमीच होत असतात. पण रविवारी रात्री चौथ्या सीटवर बसण्यावरुन एका प्रवाशाला बेदम मारहाण झाली. चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या जनरल डब्ब्यात, रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मिरारोड स्टेशनजवळ हा प्रकार घडला. तिसऱ्या सीटवर बसलेल्या महिलेला आत सरकण्यास सांगून चौथ्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला, महिलेच्या सहकाऱ्यांनी बेदम […]

विरार लोकलमध्ये चौथ्या सीटवरून प्रवाशाला चोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये मारहाणीचे प्रकार नेहमीच होत असतात. पण रविवारी रात्री चौथ्या सीटवर बसण्यावरुन एका प्रवाशाला बेदम मारहाण झाली. चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या जनरल डब्ब्यात, रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मिरारोड स्टेशनजवळ हा प्रकार घडला.

तिसऱ्या सीटवर बसलेल्या महिलेला आत सरकण्यास सांगून चौथ्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाला, महिलेच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालीय. इतर प्रवाशांनी भांडण सोडवलं खरं, पण हाणामारीदरम्यान, डब्ब्यातील इतर महिला प्रवाशांनाही धक्काबुक्की झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number