#FifaWorldCup2018 सेनेगल हा विजयी सलामी देणारा पहिला आफ्रिकी देश…

वृत्तसंस्था, दिल्ली रशियातल्या फिफा विश्वचषकात सेनेगल हा विजयी सलामी देणारा पहिला आफ्रिकी देश ठरला आहे. सेनेगलनं आपल्या विश्वचषक मोहिमेची मोठ्या दिमाखात सुरुवात केली. जोरदार आक्रमण करत पोलंडचा २-१ असा पराभव करून सेनेगलनं रशियातल्या विश्वचषकात विजयी सलामी दिली. पोलंडच्या खेळाडूंकडून झालेल्या चुकांचा यावेळी सेनेगलला चांगलाच फायदा झाला.  सामन्याच्या 37व्या मिनिटाला थिआगो सिओनेकने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू धाडल्याने सेनेगलचा पहिला गोल झाला. […]

#FifaWorldCup2018 सेनेगल हा विजयी सलामी देणारा पहिला आफ्रिकी देश…

वृत्तसंस्था, दिल्ली

रशियातल्या फिफा विश्वचषकात सेनेगल हा विजयी सलामी देणारा पहिला आफ्रिकी देश ठरला आहे. सेनेगलनं आपल्या विश्वचषक मोहिमेची मोठ्या दिमाखात सुरुवात केली. जोरदार आक्रमण करत पोलंडचा २-१ असा पराभव करून सेनेगलनं रशियातल्या विश्वचषकात विजयी सलामी दिली.

पोलंडच्या खेळाडूंकडून झालेल्या चुकांचा यावेळी सेनेगलला चांगलाच फायदा झाला. 

सामन्याच्या 37व्या मिनिटाला थिआगो सिओनेकने आपल्याच गोलपोस्टमध्ये चेंडू धाडल्याने सेनेगलचा पहिला गोल झाला. त्यानंतर मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी गोल न केल्याने सेनेगलने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली.

सामन्याचे दुसरे सत्र चांगलेच रंजक झाले. सेनेगलच्या निनांगने पोलंडचे बचावपटू आणि गोलरक्षक यांना चकवत 60व्या मिनिटाला गोल केला आणि संघाची आघाडी १ अंकांनी वाढली. या गोलनंतर पोलंडच्या संघाने जोरदार आक्रमणे करत 86व्या मिनिटाला क्रिचोविअॅकने संघासाठी पहिला गोल केला आणि त्यांना अखेर यश मिळाले. या गोलनंतर पोलंडचा संघ अधिक आक्रमक झाला, पण त्यांना दुसरा गोल करून सामन्यात बरोबरी साधता आली नाही.fifa-world-cup-2018-senegal-crashed-poland-2-1-win

#FifaWorldCup2018 सलग दुसऱ्या सामन्यात रशियाची इजिप्तवर 3-1 ने मात….

#FifaWorldCup2018 बेल्जियमचा विजय, पनामाचा ३-० ने धुव्वा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number