Homeमहाराष्ट्र #FifaWorldCup2018 मोरॅक्को स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत
#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत
वृत्तसंस्था, दिल्ली फुटबॉल विश्वचषकातील मोरॅक्कोविरुद्धच्या लढतीत स्पेनला 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. परंतु या बरोबरीनंतरही स्पेनचा संघ बाद फेरीत दाखल होण्यात यशस्वी ठरला आहे. सामन्याच्या 14व्या मिनिटाला खलिद बोऊतैबचा मोरॅक्कोसाठी पहिला गोल त्यानंतर पाच मिनिटांनीच स्पेनचा त्यांच्यावर यशस्वी हल्ला स्पेनच्या इस्कोने 19व्या मिनिटाला गोल केला आणि सामना मध्यंतरापर्यंत 1-1 असा बरोबरीत राहिला. दुसऱ्या सत्रात मोरॅक्कोचा […]
फुटबॉल विश्वचषकातील मोरॅक्कोविरुद्धच्या लढतीत स्पेनला 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. परंतु या बरोबरीनंतरही स्पेनचा संघ बाद फेरीत दाखल होण्यात यशस्वी ठरला आहे.
सामन्याच्या 14व्या मिनिटाला खलिद बोऊतैबचा मोरॅक्कोसाठी पहिला गोल
त्यानंतर पाच मिनिटांनीच स्पेनचा त्यांच्यावर यशस्वी हल्ला
स्पेनच्या इस्कोने 19व्या मिनिटाला गोल केला आणि सामना मध्यंतरापर्यंत 1-1 असा बरोबरीत राहिला.
दुसऱ्या सत्रात मोरॅक्कोचा आक्रमक खेळ
मोरॅक्कोच्या इन नेसयारीने गोल केला आणि संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
मोरॅक्कोच्या या गोलनंतर स्पेन संघ आक्रमक
त्यांनी भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटाला गोल करत सामन्यात 2-2 अशी बरोबरी केली. स्पेनसाठी हा निर्णायक गोल इअॅगो अॅसपसने केला.