वृत्तसंस्था, दिल्ली
क्रोएशियाने आईसलँडवर विजय मिळवत फुटबॉल विश्वचषकातील ‘ ड ‘ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. इव्हान पर्सिकने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर क्रोएशियाला हा विजय मिळवता आला.
सामन्याच्या 53व्या मिनिटाला गोल करत पर्सिकने क्रोएशियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण आईसलँडने या गोलचा वचपा काढला. सामन्याच्या 76व्या मिनिटाला सिग्युर्डसनने स्पॉट किकवर गोल केला आणि संघाला 1-1 अशी बरोबरी करून दिली.
सामन्याची निर्णायक 90 मिनिटे संपायला काही अवधी शिल्लक होता. तेव्हा क्रोएशियाने जोरदार आक्रमण लगावले आणि यामध्ये त्यांना यशही आले.
#FifaWorldCup2018 अर्जेंटिनाची नायजेरियाला नमवत बाद फेरीत धडक
#FifaWorldCup2018 दिग्गज पोर्तुगालला इराणने बरोबरीत रोखले
#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत