आता फिव्हर ‘फिफा विश्वचषक फुटबॉल’चा…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई उद्यापासून सुरू होत असलेल्या फुटबॉलच्या सर्वांत प्रतिष्ठेच्या जेतेपदासाठी जगातील ३२ संघांदरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे. विश्वचषक फुटबॉल महासंग्रामाकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच यंदाच्या स्पर्धेत कोणता स्टार खेळाडू आपले वर्चस्व प्रस्थापित करणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  या विश्वचषक फुटबॉल महासंग्रमात जवळपास 736 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या खेळाडूंमध्ये 53 असे […]

आता फिव्हर ‘फिफा विश्वचषक फुटबॉल’चा…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

उद्यापासून सुरू होत असलेल्या फुटबॉलच्या सर्वांत प्रतिष्ठेच्या जेतेपदासाठी जगातील ३२ संघांदरम्यान चुरस अनुभवायला मिळणार आहे. विश्वचषक फुटबॉल महासंग्रामाकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.

त्यासोबतच यंदाच्या स्पर्धेत कोणता स्टार खेळाडू आपले वर्चस्व प्रस्थापित करणार, याचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

या विश्वचषक फुटबॉल महासंग्रमात जवळपास 736 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या खेळाडूंमध्ये 53 असे खेळाडू आहेत, की त्यांच्या नावावर विश्वचषकात एक तरी गोल केल्याची नोंद आहे. 

फिफा विश्वचषकात जर्मनीचा माजी स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोजेने 24 सामन्यात सर्वाधिक 16 गोल केले आहेत. त्यानंतर ब्राझिलचा स्टार खेळाडू ख्रिस्तिआनो रोनाल्डो आहे. रोनाल्डोने 19 सामन्यात 14 गोल केले आहेत. 

फिफा 2018 विश्वचषकात सहभागी खेळाडूंची नावे आणि गोल…

  • थॉमस मुलर (जर्मनी) – 10
  • जेम्स रोड्रिग्ज (कोलंबिया) – 6
  • लियोनेल मेसी (अर्जेंटीना) – 5 
  • गोंजालो हिगुएन (अर्जेंटिना) – 5
  • लुइस सुआरेज (उरुग्वे) – 5
  • टिम काहिल (ऑस्ट्रेलिया) – 5

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number