पिंपरी – चिंचवडमध्ये दुकानाला भीषण आग

पुणे, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहानग्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. पहाटेच्या सुमारास चिखलीमधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती. याच हार्डवेअरमध्ये कुटुंब वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे. ही आग इतकी भीषण […]

पिंपरी – चिंचवडमध्ये दुकानाला भीषण आग

पुणे, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहानग्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

पहाटेच्या सुमारास चिखलीमधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती. याच हार्डवेअरमध्ये कुटुंब वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे. ही आग इतकी भीषण होती की, आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. यामध्ये दोन लहानग्यांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळं ही भीषण आग लागली असल्याचा अग्निशामक दलाचा प्राथमिक अंदाज आहे. पिंपरी – चिंचवड अग्निशामक दलाने ही आग नियंत्रणात आणली असून, कुलिंगचे काम सुरु आहे.

या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झालाय. चौधरी कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. दुकानाच्या माळावर चौधरी कुटुंबीय राहत होते. दुकानात ऑईल पेंट असल्याने आगीनं रौद्ररूप धारण केलं. याच पेंटच्या आगीने दुकानात वायू निर्माण झाला. आग आणि वायू यात गुदमरुन पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. राजस्थानचं हे कुटुंब हार्डवेअरचं दुकान चालवायचं आणि दुकानाच्या माळावर राहत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number