Fidel Softech: फिडेल सॉफ्टटेकने गाठला 100 कोटी रुपये महसुलाचा टप्पा; आता 500 कोटीं रुपयांचे लक्ष्य

कंपनीने सलग चौथ्या वर्षी भागधारकांसाठी २२.५ टक्के लाभांश जाहीर केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी दिली. 

Fidel Softech: फिडेल सॉफ्टटेकने गाठला 100 कोटी रुपये महसुलाचा टप्पा; आता 500 कोटीं रुपयांचे लक्ष्य

पुणे, पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२६) माहिती तंत्रज्ञान आणि भाषा सेवा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी फिडेल सॉफ्टटेकने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती करत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ₹१०० कोटी रुपये महसुलाचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. माहिती तंत्रज्ञान आणि भाषा सेवा यांच्या प्रभावी एकत्रीकरणातून कंपनीने उद्योगक्षेत्रात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे. आता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड क्लाऊड टेक्नॉलॉजी, एंटरप्राइझ सॉफ्टवेअर सोल्युशन्स, एआय अँड डेटा ऍनालीटीक्स तसेच जपान-इंडिया कन्सल्टिंग यांसारख्या विविध सेवा क्षेत्रा मध्येही फिडेल सॉफ्टटेक यशस्वीपणे कार्यरत आहे. तसेच कंपनीने सलग चौथ्या वर्षी भागधारकांसाठी २२.५ टक्के लाभांश जाहीर केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी दिली.  बुधवारी, पुणे येथे फिडेल सॉफ्टटेक कंपनीची वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक प्राची कुलकर्णी, संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राजक्ता कोटस्थाने, संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर तसेच कंपनी सचिव स्नेहा रत्नपारखी आदी उपस्थित होते. 

सुनील कुलकर्णी यांनी सांगितले की, या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय पुणे येथे असून पुण्यासह हैदराबाद, चेन्नई, दिल्ली आणि बेंगळुरू येथे कंपनीची कार्यालये आहेत. भारताबाहेर जपान आणि अमेरिकेतही कंपनीचा विस्तार झाला आहे. ५०० हून अधिक व्यावसायिकांच्या सक्षम टीमच्या बळावर फिडेल सॉफ्टटेक जागतिक स्तरावरील ग्राहकांना दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण सेवा पुरवत आहे. येत्या काही वर्षांत कंपनी ₹५०० कोटी महसुलाचा टप्पा गाठेल. कंपनीची सातत्याने होत असलेली प्रगती आणि वाढता व्यवसाय यामुळे हे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. व्यवस्थापकीय संचालक प्राची कुलकर्णी यांनी सांगितले की, व्यवसाय वृद्धी बरोबरच फिडेल सॉफ्टटेकने कौशल्य विकास, स्टार्ट अप यांना मार्गदर्शन व सहाय्य, तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. बैठकीत कंपनीची महसुली वाढ, नफा आणि इतर प्रमुख आर्थिक निर्देशकांचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला.

हेही वाचा – Gen Alpha Social Media Ban: लहान मुलांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा प्लॅन; 13 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया होणार बंद ? 

पुढील आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. यामध्ये यामध्ये अमेरिका, जपान – भारत व्यवसाय महसुलाची गती कायम ठेवणे. भारतातून ऑफ शोअर डिलिव्हरी वाढवताना अमेरिका – जपान मधील अधिग्रहणांना एकात्मिक जागतिक संस्थेमध्ये समाकलित करणे. एआय सक्षम सेवांची निर्मिती करताना महसूल करारांचा विस्तार करणे. विक्री आणि विपणन क्षमता मजबूत करणे. भारत – जपान कन्सल्टिंग आणि जीसीसी प्लॅटफॉर्म विकसित करून आर्थिक शिस्तीसह निवडक अधिग्रहणांच्या संधींचा पाठपुरावा करणे तसेच एकूण नफा वाढ करण्यासाठी धोरण तयार करणे अशी माहिती फिडेल सॉफ्टटेक कंपनीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number