जय महाराष्ट्र न्यूज, पुणे नारायणगाव-महामार्ग आता मनुष्यासाठीच नव्हे, तर वन्य प्राण्यांसाठीसुद्धा धोकादायक ठरतोय. नारायणगाव येथील मुक्ताई ढाबा या ठिकाणी 7 ते 8 वर्षांच्या बिबट्या मादीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. वन विभागाचे अधिकारी मनीष काळे यांनी पंचनामा करून मृत मादी बिबट्याला ताब्यात घेतले.