Tukaram Mundhe Raid on Cosmetic Products: महिलांच्या ड्रेसिंग टेबलपर्यंत पोहोचली FDA ची नजर! तुकाराम मुंडेंच्या कारवाईत समोर आलं धक्कादायक वास्तव

या नव्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही घटकांमध्ये तसेच महिला वर्गातही चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. 

Tukaram Mundhe Raid on Cosmetic Products: महिलांच्या ड्रेसिंग टेबलपर्यंत पोहोचली FDA ची नजर! तुकाराम मुंडेंच्या कारवाईत समोर आलं धक्कादायक वास्तव

एफडीएकडून मागील काही दिवसांपासून राज्यभरात व्यापक स्तरावर कारवाई करण्यात येत आहे. या धडक मोहिमेमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दूध, पनीर, बेकायदेशीर गुटखा आणि बनावट औषधांवर कारवाई केल्यानंतर आता एफडीएने आपली मोहीम आणखी तीव्र केली आहे. या नव्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही घटकांमध्ये तसेच महिला वर्गातही चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. 

तंबाखू विक्रेते तसेच बेकायदेशीर आणि बनावट औषध विक्रेत्यांवर कठोर कारवाई केल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आपला मोर्चा सौंदर्यप्रसाधनांच्या (ब्युटी प्रोडक्ट्स) क्षेत्राकडे वळवला आहे. राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या आणि विनापरवाना उत्पादन व विक्री करणाऱ्या कंपन्यांवर एफडीएने छापे टाकले आहेत. या कारवाईत एकूण 34 लाख 61 हजार रुपयांची सौंदर्यप्रसाधने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये तपासणीत अनेक नामांकित उत्पादनांवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक आणि उत्पादकाची कोणतीही माहिती नसल्याचे किंवा अपुरी असल्याचे समोर आले. 

हेही वाचा – Ahmedabad Plane Crash: 'त्या तांत्रिक त्रुटींची स्वतंत्र तपासणी करा…'; अहमदाबाद विमान अपघाताबाबत पायलट संघटनेचे PMO अन् DGCA ला पत्र 

मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरात 'ब्रेस्ट एन्लार्ज', 'बट एन्हान्समेंट' आणि 'फॅट बर्नर'सारखे भ्रामक आणि जादुई दावे करणाऱ्या उत्पादनांवर छापा टाकून 1.20 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे, कांदिवली पश्चिम येथील एका संस्थेवर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक बाब उघड झाली. येथे कोणत्याही आवश्यक परवान्याशिवाय सौंदर्यप्रसाधने आणि औषधांचे उत्पादन सर्रास सुरू होते. एफडीएने येथून विनापरवाना ब्युटी प्रोडक्ट्स, कच्चा माल आणि यंत्रसामग्रीसह 3.96 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number