तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. त्यांनी राज्यभर धडक कारवाया सुरू केल्या आहेत. हॉटेलच्या स्वयंपाक घरात थोडीही घाण आणि अस्वच्छता आढळली की, त्यांच्याकडून परवाने रद्द केले जात आहेत. ही कारवाई कोण्या एका शहरात नाही तर राज्यभर सुरू आहे.
अशातच एफडीएची नाशिक विभागात मोठी धडक कारवाई केली आहे. त्यांनी दोन दिवसांत 20 हॉटेल, आणि रेस्टॉरंट मधील खाद्य पदार्थांची तपासणी केली. यावेळी अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने 7 नामांकित हॉटेल-रेस्टॉरंटचे परवाने तात्काळ रद्द करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे सुधारणा नोटीसचे पालन न करणाऱ्या आणखी रेस्टॉरंट वर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे. तपासणीदरम्याने स्वयंपाकघरात अस्वच्छता, माश्यांचा व घाणीचा सापळा, अन्नपदार्थ उघड्यावर ठेवल्याचे आढळले. तसेच कोल्ड स्टोरेज व तापमानाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचेही निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न झाल्याचेही निदर्शनास आले. अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.