Mumbai News : धक्कादायक! मुंबईतील या प्रसिद्ध आईस्क्रीम दुकानात जिवंत उंदीर, माश्यांचा वावर; FDA ने उगारला कारवाईचा बडगा

मुंबई : मुंबईतील 'आइसक्रीम सँडविच'साठी प्रसिद्ध असलेल्या 'के. रुस्तम अँड कंपनी' या लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या दुकानाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेबाबत गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले. यामध्ये जिवंत उंदीर, माश्या, मुदत संपलेली खाद्य उत्पादने आणि 'कोल्ड चेन' राखण्यातील त्रुटी यांचा समावेश होता. 'अन्न सुरक्षा आणि मानके […]

Mumbai News : धक्कादायक! मुंबईतील या प्रसिद्ध आईस्क्रीम दुकानात जिवंत उंदीर, माश्यांचा वावर; FDA ने उगारला कारवाईचा बडगा

मुंबई : मुंबईतील 'आइसक्रीम सँडविच'साठी प्रसिद्ध असलेल्या 'के. रुस्तम अँड कंपनी' या लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या दुकानाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेबाबत गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळून आले. यामध्ये जिवंत उंदीर, माश्या, मुदत संपलेली खाद्य उत्पादने आणि 'कोल्ड चेन' राखण्यातील त्रुटी यांचा समावेश होता. 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006' अंतर्गत 7 आणि 8 जुलै रोजी एफडीएने (FDA) राबवलेल्या राज्यव्यापी अंमलबजावणी मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेट येथील संबंधित आस्थापनेने 'अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी) नियम, 2011' च्या अनुसूची 4 मध्ये विहित केलेल्या स्वच्छताविषयक निकषांचे उल्लंघन केल्याचे निरीक्षकांना आढळून आले.

हेही वाचा : Honeymoon Coach : फुगे-फुलांचं डेकोरेशन, रेल्वेचा कोच बनला हनिमून सूट; व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाची कडक कारवाई

एफडीएच्या (FDA) माहितीनुसार, वीर नरिमन रोडवरील 'ब्रेबॉर्न स्टेडियम हाऊस'मध्ये असलेल्या या आस्थापनेची तपासणी करताना निरीक्षकांना तिथे जिवंत उंदीर आणि माश्या आढळल्या. तसेच 'कोल्ड चेन'च्या प्रक्रियेत त्रुटी, अनिवार्य नोंदी न ठेवणे आणि मुदत संपलेली खाद्य उत्पादने यांसारख्या गोष्टीही निदर्शनास आल्या. या तपासणीनंतर, विभागाने 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006' च्या कलम 32(3) अन्वये या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना स्थगित केला. 'के रुस्तम' विरुद्धची ही कारवाई राज्यव्यापी धडक मोहिमेचा एक भाग होती. या मोहिमेअंतर्गत एफडीएने (FDA) 7 जुलै रोजी 16 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची तपासणी केली. यात दहा आस्थापनांना सुधारणेबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या. तर गंभीर नियमोल्लंघनामुळे 'के रुस्तम'सह तीन खाद्यपदार्थ व्यवसायांचे परवाने निलंबित करण्यात आले.

यामध्ये धुळे येथील 'हॉटेल पाटीलवाडा'चा समावेश आहे. हे हॉटेल आवश्यक अन्न व्यवसाय परवान्याशिवाय चालवले जात असल्याचे आढळून आले होते. तसेच, नागपूर येथील 'श्री हिरा स्वीट्स प्रा. लि.' चा परवानाही निलंबित करण्यात आला. कारण तेथे अन्नपदार्थ तयार करण्याच्या जागेजवळ निरीक्षकांना मेलेला उंदीर आढळला. एफडीएने (FDA) संपूर्ण महाराष्ट्रात सहा ठिकाणी छापे टाकले आणि या मोहिमेदरम्यान पान मसाला व गुटख्यासह 9,60,416 रुपये किमतीची प्रतिबंधित खाद्य उत्पादने जप्त केली. प्रतिबंधित खाद्य उत्पादनांची विक्री, वितरण आणि वाहतूक केल्याप्रकरणी एक एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number