IAS Tukaram Mundhe : रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्याची कायदेशीर सक्ती नाही; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले स्पष्ट

मुंबई : रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना औषधे किंवा वैद्यकीय साहित्य केवळ हॉस्पिटलमधील अधिकृत फार्मसीमधूनच खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही, असे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांच्या अधिकारांचे संरक्षण करणारा हा निर्णय जाहीर करत रुग्णालयांना कडक इशाराही दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना […]

IAS Tukaram Mundhe : रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्याची कायदेशीर सक्ती नाही; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले स्पष्ट

मुंबई : रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना औषधे किंवा वैद्यकीय साहित्य केवळ हॉस्पिटलमधील अधिकृत फार्मसीमधूनच खरेदी करण्यास भाग पाडता येणार नाही, असे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांच्या अधिकारांचे संरक्षण करणारा हा निर्णय जाहीर करत रुग्णालयांना कडक इशाराही दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना आवश्यक असलेली औषधे आणि वैद्यकीय साहित्य रुग्णालयाच्या अंतर्गत फार्मसीमधूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. मात्र, अशी सक्ती कोणत्याही कायद्यात मान्य नाही. “रुग्णाला औषधे कुठून खरेदी करायची हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. रुग्णालय प्रशासन किंवा कोणतीही संस्था त्यांच्यावर दबाव टाकू शकत नाही. बाहेरील नोंदणीकृत मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करणे हा रुग्णांचा वैयक्तिक आणि कायदेशीर अधिकार आहे,” असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Chhagan Bhujbal : ‘संजय राऊतांच्या सांगण्यावरुन खातेवाटप होणार का?’, छगन भुजबळांचा टोला; राज्यसभेची उमेदवारीवरून स्पष्टच सांगितलं…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number