नराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य

नराधम बापाने आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. अवघ्या 12 वर्षांची मुलगी यामुळे गरोदर झाली आहे. या घटनेचा खुलासा होताच पोलिसांनी नराधम योगेश दोहतरेला अटक केली आहे. आपल्या मुलीकडे घरी अभ्यासासाठी येणाऱ्या मैत्रिणीवर योगेश लैंगिक अत्याचार करत असे. तसंच याबद्दल कुणालाही सांगितल्यास जीवे मारून टाकायची धमकी देत असे. […]

नराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य

नराधम बापाने आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. अवघ्या 12 वर्षांची मुलगी यामुळे गरोदर झाली आहे. या घटनेचा खुलासा होताच पोलिसांनी नराधम योगेश दोहतरेला अटक केली आहे.

आपल्या मुलीकडे घरी अभ्यासासाठी येणाऱ्या मैत्रिणीवर योगेश लैंगिक अत्याचार करत असे. तसंच याबद्दल कुणालाही सांगितल्यास जीवे मारून टाकायची धमकी देत असे. हा प्रकार एकदाच नव्हे, तर वारंवार होत होता. एक दिवस मैत्रिणीने पोटात दुखत असल्याचं घरच्यांना सांगितलं. त्यावेळी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये ही 12 वर्षांची मुलगी 4 महिन्यांची pregnant असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. याबद्दल मुलीला विचारल्यानंतर तिच्याकडून योगेश करत असलेल्या लैंगिक अत्याचारांची माहिती मिळाली. मैत्रिणीचे वडील आपल्याच लेकीच्या वयाच्या मैत्रिणीसोबत लैंगिक अत्याचार करत असल्याचं समोर आलं. या प्रकाराबद्दल योगेशच्या मुलीची चौकशी कशी करायची हा प्रश्नही पोलिसांसमोर आहे. तिला आपल्या मैत्रिणीसोबत आपला बाप करत असलेल्या कृत्यांची माहिती होती का असा प्रस्नही पडला आहे. मात्र या घटनेमुळे चंद्रपुर परिसरात खळबळ माजली आहे. POCSO अंतर्गत बापावर आता गुन्हा दाखल होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number