धुळे, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात सात जणांचा जागीत मृत्यू झाला असून २८ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ दुपारी बार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलात शिरला. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २८ जण जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून जखमींची मदत केली जात आहे.