जय महाराष्ट्र न्यूज, वसई
नवी वाहनांना आजपासून ‘फास्ट टॅग’ बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतलाय. वाहन उत्पादक आणि विक्रेत्यांनी ही सुविधा वाहन चालकांना उपलब्ध करुन द्यावी, असं केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयानं सुचित केलंय.
केंद्रानं कॅशलेस व्यवहाराचं उद्दिष्ट ठेवत राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरुन जाणाऱ्या वाहनांना टोल भरण्यासाठी ‘फास्ट टॅग’चा पर्याय दिलाय. ‘फास्ट टॅग’ हे एक बारकोड स्टीकर असून ते वाहनांच्या समोरील बाजूस लावणं बंधनकारक आहे.
यामुळे चालकाला वाहनावरील स्टीकरवर असणाऱ्या ‘आरएफआयडी’मार्फत टोलचे पैसे भरण्यास मदत होणारेय. हे पैसे थेट बँकेतून वळते करण्यासाठी बचत खाते त्याचाशी जोडले जाईल. यामुळे वाहन चालकांसाठी टोलभरणा सोपा आणि कमी वेळखाऊ होणारेय.