मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते.उर्फीच्या अतरंगी आणि बोल्ड फॅशनमुळे ती कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. उर्फी सतत समाज माध्यमांवर आपल्या हटके लूकमधील फोटो शेअर करत असते.अनेकदा ती तिच्या हटके फॅशन मुळे अडचणीत येते. आताही असंच काहीसं झालं आहे.नुकतंच उर्फीने एक फोटो शेअर करत याबाबत सांगितलं आहे.वायरपासून बनलेला एक ड्रेस परिधान केला होता.परंतु या ड्रेसमुळे उर्फीच्या त्वचेला प्रचंड इजा झाली.
उर्फीने फोटो शेअर करत म्हटलंय, ‘माझ्या त्वचेला भरपूर इजा झालीय. मात्र ठीक आहे. सुंदर दिसण्यासाठी इतकी किंमत मोजावीच लागते.उर्फी समाज माध्यमांवर लहान आणि कमी कपड्यातच दिसून आली तिच्या ह्या कपड्यांमुळे अनेकदा वाद देखील होतात. या वादात तिने संपूर्ण अंग झाकलेले कपडे घातले मात्र तेव्हा देखील तिच्या त्वचेच्या वेदना सहन कराव्या लागल्या होत्या.
उर्फी जावेदची ‘मेरी दुर्गा’ ही तिची गाजलेली मालिका आहे. या मालिकेमुळे तिला खरी प्रसिद्धी मिळाली. याशिवाय उर्फी ‘बेपन्ना’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ सारख्या मालिकांचादेखील भाग होती. २०२० मध्ये ती इतकी लोकप्रिय झाली की २०२१ मध्ये तिला बिग बॉस OTT मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं.