शेतकऱ्यांनाच दोष देणार – प्रकाश आंबेडकर

नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारवर पूर्णपणे दबाव आणला आहे. राज्य विधिमंडळात सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. दरम्यान, किसान महामोर्चावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जातीवरून मतदान करणाऱ्या शेतकऱ्याला हमीभाव मागण्याचा अधिकार नसल्याचे […]

शेतकऱ्यांनाच दोष देणार – प्रकाश आंबेडकर

नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारवर पूर्णपणे दबाव आणला आहे. राज्य विधिमंडळात सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. दरम्यान, किसान महामोर्चावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जातीवरून मतदान करणाऱ्या शेतकऱ्याला हमीभाव मागण्याचा अधिकार नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. आंबेडकरांनी शेतकऱ्यांनाच खडेबोल सुनावले आहेत. शेतकऱ्यांचे असे किती मोर्चे आले आणि गेले त्यामुळे या प्रकरणात शेतकरीच दोषी असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, लोकसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी कंबर कसली असून भाजपावर प्रहार केला आहे. आंबेडकर यांनी गोध्रा जळीतकांडाविषयी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाला भाजपाला मतदान न करण्याचे आवाहनही केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number