Maharashtra Farmers Protest : सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटना आक्रमक, विधान भवनासमोर धान्य फेकत आंदोलन; तुपकर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील क्रांतीकारी शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला आहे. ही कर्जमाफी फसवी असल्याचे म्हणत आज, गुरुवारी त्यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर कापूस, सोयाबीन, ज्वारी फेकत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर कापूस आणि धान्य फेकले. तर काहींनी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन केले. या आंदोलनंतर पोलिसांनी […]

Maharashtra Farmers Protest :  सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटना आक्रमक, विधान भवनासमोर धान्य फेकत आंदोलन; तुपकर पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील क्रांतीकारी शेतकरी संघटनेने आक्षेप घेतला आहे. ही कर्जमाफी फसवी असल्याचे म्हणत आज, गुरुवारी त्यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर कापूस, सोयाबीन, ज्वारी फेकत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेर कापूस आणि धान्य फेकले. तर काहींनी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन केले. या आंदोलनंतर पोलिसांनी आक्रमक रविकांत तुपकर यांच्यासह तेथील आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तुपकर यांच्यासहित कार्यकर्त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनला नेले.

हेही वाचा : Mumbai News : धक्कादायक! मुंबईतील या प्रसिद्ध आईस्क्रीम दुकानात जिवंत उंदीर, माश्यांचा वावर; FDA ने उगारला कारवाईचा बडगा

यावेळी रविकांत तुपकार म्हणाले की, ‘आज आम्ही सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. आमचा गुन्हा काय आहे, तर आमच्या बापाच्या घामाचा जाब विचारत आहे. आमचं म्हणणं एकच आहे की, ही शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. या कर्जमाफीत जाचक अटी आणि निकष घातले आहेत. त्यामुळे 10 ते 15 टक्के शेतकरी कर्जमाफीत बसणार नाहीत. या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करा. शेतकऱ्यांना हक्काचा पिकविमा द्या. या मागण्याची सरकार दखल घेत नाही. यासाठी मंत्री गिरीश महाजन बैठक लावतो असे म्हणाले. परंतु त्यांनी अद्याप बैठक लावलेली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number