गारपीटग्रस्त शेतकरी आक्रमक; महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नागपूर जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर खुरसापार येथे रास्ता रोको केला. मुख्यमंत्र्यांनी या भागात तात्काळ भेट द्यावी व पंचनामे करून घ्यावे अशी या शेतकऱ्यांनी मागणी केली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात भाजप आमदार आशिष देशमुख देखील सहभागी झाले होते. सोमवारी सायंकाळी या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड […]

गारपीटग्रस्त शेतकरी आक्रमक; महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नागपूर जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर खुरसापार येथे रास्ता रोको केला. मुख्यमंत्र्यांनी या भागात तात्काळ भेट द्यावी व पंचनामे करून घ्यावे अशी या शेतकऱ्यांनी मागणी केली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात भाजप आमदार आशिष देशमुख देखील सहभागी झाले होते. सोमवारी सायंकाळी या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

संत्रे, मोसंबी, गहू , हरभरा या पिकांचे 100 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले. त्यामुळे हे शेतकरी प्रचंड आक्रमक झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: येऊन नुकसान भरपाईची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार आशिष देशमुख नाराज आहेत. आशिष देशमुख शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number