कर्जमाफीचा लाभ मिळणार ?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कर्जमाफीसाठी मराठवाड्यातील 13 लाख 10 हजार 272 शेतकर्‍यांनी आतापर्यंत आपले ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेद्वारे कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 24 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी कर्जमाफीचे अर्ज भरताना सर्व्हर जाम होणे, इंटरनेट कनेक्शन नसणे, आधार कार्डशी मोबाइल क्रमांक लिंक नसणे यासारख्या कारणांमुळे शेतकर्‍यांना इंटरेट […]

कर्जमाफीचा लाभ मिळणार ?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्जमाफीसाठी मराठवाड्यातील 13 लाख 10 हजार 272 शेतकर्‍यांनी आतापर्यंत आपले ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेद्वारे कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 24 जुलैपासून सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी कर्जमाफीचे अर्ज भरताना सर्व्हर जाम होणे, इंटरनेट कनेक्शन नसणे, आधार कार्डशी मोबाइल क्रमांक लिंक नसणे यासारख्या कारणांमुळे शेतकर्‍यांना इंटरेट कॅफेसमोर उभे राहावे लागत आहे. सातत्याने संकटाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल अशी आशा आहे.

आतापर्यंत ऑनलाईन भरलेल्या अर्जाचा आकडा –

औरंगाबाद – 2 लाख, 8 हजार 848

जालना – 2 लाख, 16 हजार 851

हिंगोली – 97 हजार 319

परभणी – 1 लाख, 11 हजार 530

नांदेड – 1 लाख, 98 हजार 922 

बीड – 1 लाख, 81 हजार 394

उस्मानाबाद – 1 लाख, 19 हजार 170 

लातूर – 1 लाख, 76 हजार 238

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number