बुलढाणा, १९ मे २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यात २०२२ या वर्षभरात तब्बल ३२० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी जय महाराष्ट्राच्या हाती लागली आहे.
त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याच भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आल आहे. बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या होताना पाहायला मिळत आहेत. गेल्या ४ चार दिवसात ४ शेतकऱ्यांनी सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. सरकारी योजना शेतकरी आत्महत्या रोखण्यात सपशेल अपयशी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात तब्बल ७५ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचं भीषण वास्तव समोर आले आहे.