शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद

संभाजीनगर, १५ मे २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर बाजार समिती मध्ये कांदा एक रूपयांनी खरेदी होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडुन वैजापूर-गंगापूर हायवे बंद पाडला आहे.राज्यात मागील महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल सरासरी शंभर रूपये दर मिळत आहे.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात […]

शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडला बंद

संभाजीनगर, १५ मे २०२३, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर बाजार समिती मध्ये कांदा एक रूपयांनी खरेदी होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडुन वैजापूर-गंगापूर हायवे बंद पाडला आहे.राज्यात मागील महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल सरासरी शंभर रूपये दर मिळत आहे.त्यामुळे कांदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत.मागील आठवड्यात गंगापूर बाजार समितीमध्ये कांदा एक रूपयांनी खरेदी झाल्यानें संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा अंत्यविधी केला होता. मात्र आज सकाळी कांद्याचा लिलाव सुरु असताना पुन्हा कांद्याला एक रुपया भाव लागला असल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडुन वैजापूर-गंगापूर हायवे बंद पाडला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number