शेतकऱ्यांकडन ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा, आंदोलक शेतकऱ्यांची घरवापसी

वर्षभरापासून दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून शेतकरी आंदोलन मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा आज करणार असून बळीराजा आजचा ११ डिसेंबर हा दिवस ‘शेतकरी विजय दिवस’ म्हणून साजरा करत आहेत. कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या पत्रानंतर शेतकरी आंदोलन स्थगित […]

शेतकऱ्यांकडन ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा, आंदोलक शेतकऱ्यांची घरवापसी

वर्षभरापासून दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून शेतकरी आंदोलन मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा आज करणार असून बळीराजा आजचा ११ डिसेंबर हा दिवस ‘शेतकरी विजय दिवस’ म्हणून साजरा करत आहेत.

कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या पत्रानंतर शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले. तसेच एका वर्षानंतर शेतकऱ्यांनी आपल्या घराची वाट धरली आहे.

अखेर एक वर्षानंतर केंद्र सरकारच्या कृषी कायदे रद्द करण्याचा घोषणेमुळे शेतकरी आंदोलनाचा मोठं यश लाभले आहे. हजारो शेतकऱ्यांनी कृषी आंदोलनात सहभाग दर्शविला होता. शेतकऱ्यांनी सिंघू, गाझीपूर आणि टिकरी बॉर्डवरील महामार्गावरील बांधण्यात आलेले तंबू हटवण्यास सुरूवात केली आहे. हरयाणा, उत्तर प्रेदश, पंजाब आणि इतर राज्यातील शेतकरी आंदोलन करण्यास एकत्र जमले होते. मात्र आता शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर शेतकऱ्यांनी घरवापसी सुरू केली आहे.

नोव्हेंबर २०२०पासून शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू केले होते. आणि आता तब्बल एका वर्षानंतर शेतकऱ्यांनी कृषी आंदोलन मागे घेतले. मात्र या कृषी आंदोलनादरम्यान एकूण ७०० शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number