राजकीय दबावामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड   पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय दबावामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 56 वर्षीय आदिवासी शेतकरी बजरंग मारुती मोरमारे यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.   शेतातून बेकायदेशीरपणे रस्ता काढण्याकरता राष्ट्रवादी पंचायत समिती सदस्य दत्ता शेवाळे यांनी मोरमारे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. शेतातून रस्ता काढण्यास […]

राजकीय दबावामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड

 

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय दबावामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 56 वर्षीय आदिवासी शेतकरी बजरंग मारुती मोरमारे यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 

शेतातून बेकायदेशीरपणे रस्ता काढण्याकरता राष्ट्रवादी पंचायत समिती सदस्य दत्ता शेवाळे यांनी मोरमारे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. शेतातून रस्ता काढण्यास आत्महत्याग्रस्त शेतकरी बजरंग मोरमारेंचा विरोध होता. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते दत्ता शेवाळे यांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर दत्ता शेवाळेंसमोरच शेतकऱ्याने विष प्राशन केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

 

विष प्राशन केल्यानंतर बजरंग मोरमारे यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. एकिकडे विरोधक शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या आत्महत्या रोखल्या जाव्या याकरता संघर्ष यात्रा काढत आहेत. तर दुसरीकडे मात्र विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमुळेच शेतकरी आत्महत्या करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number