जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शांततेत आंदोलनं झाली, सरकारला निवेदनं दिली. मात्र तरीही सरकारनं दखल न घेतल्यानं अखेर बळीराजा संपावर गेला आहे.
इतिहासात पहिल्यांदाच शेतकऱ्यानं संपाचं हत्यार उपसले. राज्यातील शेतकऱ्यांनी या संपाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दुधाची विक्री बंद केली असून, शहरं, महानगरांकडे जाणारा शेतमालही थांबवला आह
बाजार समित्या आणि अनेक दूध संकलन केंद्रांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.