जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली असून हे अर्ज २० मे पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. वंचित शेतकऱ्यांनी नजिकच्या ‘आपले सरकार सेवा’ केंद्रावर जाऊन किंवा स्वत: माहिती भरून ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे .
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा, या हेतूने शासनाने शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून करण्यात आले होते.
राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. ही सुविधा त्या शेतकऱ्यांसाठी असून यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.