माकडाबरोबर चर्चा करा, पण सातबारा कोरा करा- राजू शेट्टी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक 1 जूनपासून राज्यातला शेतकरी संपावर गेला. पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. पण आता सात दिवसानंतर या संपाचं काय होणार याचा निर्णय आज होणार आहे. नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक आयोजीत करण्यात आली. या बैठकीतच पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी मौन व्रत पाळून सरकारचा निषेध केला होता.    […]

माकडाबरोबर चर्चा करा, पण सातबारा कोरा करा- राजू शेट्टी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

1 जूनपासून राज्यातला शेतकरी संपावर गेला. पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं. पण आता सात दिवसानंतर या संपाचं काय होणार याचा निर्णय आज होणार आहे.

नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक आयोजीत करण्यात आली. या बैठकीतच पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी मौन व्रत पाळून सरकारचा निषेध केला होता. 

 

माकडाबरोबर चर्चा करा, पण सातबारा कोरा करा अशी उपरोधिक मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी ते नाशिकमध्ये सुकाणू समितीच्या बैठकीला आले होते. त्यावेळी ते जय महाराष्ट्रशी बोलत होते.

 

देशातल्या इतर राज्यांचा दौरा सुरू करणार आहे. स्वामिनाथन आयोगाच्या सूचना लागू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणून, शेतकऱ्यांसाठी त्यांचीही मदत घेणार असल्याची राजू शेट्टी यांनी म्हटलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number