जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकरी संपाची ठिणगी पडली ती पुणतांब्यामधून. याच पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना संपात उतरण्याची गळ घातली.
त्यासाठी पुणतांब्याच्या ज्येष्ठ शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन राजगडावर राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंनी राज्यातल्या शेतकरी संपाचं नेतृत्व करावं, कर्जमाफीवर राज्य
सरकारशी बोलणी करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली.
राज ठाकरेंनीही शेतकऱ्यांच्या एका मागणीला प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज ठाकरे स्वत पुणतांब्याला जाणार आहेत. मनसे नेते बाळा
नांदगावकर यांनी ही माहिती दिली.