जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
उद्या पासून राज्यभरातील शेतकरी संपावर जाणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यात किसान क्रांती संघटनेनं पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला.
दूध,फळ, भाज्या तसेच अन्य शेतमाल मार्केट तसच रस्त्यावर विक्री न करण्याचं शेतकऱ्यांनी ठरवलंय आणि राज्यभरातल्या शेतकऱ्यांना तसं आवाहन करण्यात येणार
आहे.
पुणतांब्यातील शेतकरी आपलं दुध शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोफत वाटणार आहे. राज्यातील शेतकरी आज मध्य रात्री पासुन संपावर जात आहे.
काल रात्री मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेतुन समाधान न झाल्याने शेतकरी आपल्या गावाकडे परतले असुन उदयाची संपाची तयारी सुरु केली आहे.