या अटी-शर्थी पूर्ण केल्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणार योग्य दर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी पणन विभागातर्फे किमान आधारभूत दरानं पीक खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी काही साध्या-सोप्या अटी-शर्थिंची पुर्तता शेतकऱ्यांना कारावी लागणार आहे.  काय आहेत या अटी-शर्थी  – शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रात, बाजार समितीत ऑनलाईन नोंदणी करावी – सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स सोबत ठेवावी – केंद्रानं […]

या अटी-शर्थी पूर्ण केल्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणार योग्य दर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी पणन विभागातर्फे किमान आधारभूत दरानं पीक खरेदी केली जाणार आहे.

त्यासाठी काही साध्या-सोप्या अटी-शर्थिंची पुर्तता शेतकऱ्यांना कारावी लागणार आहे. 

काय आहेत या अटी-शर्थी 

– शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रात, बाजार समितीत ऑनलाईन नोंदणी करावी

– सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स सोबत ठेवावी

– केंद्रानं निश्चित केलेला FAQ प्रतीचा मालच विक्रीस आणावा

– मालाची चाळणी करुनच माल खरेदी केंद्रावर आणावा

– माल वाळलेला आणि कमाल आद्रता 12 टक्के पर्यंतच असावी

– प्रतिक्षा टाळण्यासाठी खरेदी दिनांक, वेळ SMS द्वारे कळवली जाईल

– खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम आठवड्याभरात जमा होईल

– मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसंदर्भात माहितीसाठी फोन 022-23752294 वर संपर्क साधा

– तर कापूस खरेदीसंदर्भात माहितीसाठी फोन 0712-2226624 वर संपर्क साधा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number