जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकरी कर्जमाफीसाठी सामाजिक न्याय विभागाचा फंड वळवण्यात आला आहे.
घटनेनुसार अनुसूचित जाती, जमातींचा फंड वळवता येत नाही तरीही शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 500 कोटींचा फंड वळवण्यात आला आहे.
सरकारच्या निर्णयाचा ताण अनुसूचित जातीच्या योजनांवर होण्याची शक्यता आहे.
हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.