शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठे यश; निकषासह सरसरकट कर्जमाफी तत्वतः मान्यता दिल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यातील शेतकऱ्यांचा संप आणि आंदोलनाला मोठे यश मिळाले. कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता देण्यात आली असून अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज तात्काळ माफ करण्यात आले.   शेतकरी आंदोलकांची सुकाणू समिती आणि मंत्रिगट यांच्यात आज झालेल्या बैठकीनंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. तसेच दुधाचे दर दोन दिवसांत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून […]

शेतकऱ्यांच्या लढ्याला मोठे यश; निकषासह सरसरकट कर्जमाफी तत्वतः मान्यता दिल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यातील शेतकऱ्यांचा संप आणि आंदोलनाला मोठे यश मिळाले. कर्जबाजारी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता देण्यात आली असून अल्पभूधारक

शेतकऱ्यांचं कर्ज तात्काळ माफ करण्यात आले.

 

शेतकरी आंदोलकांची सुकाणू समिती आणि मंत्रिगट यांच्यात आज झालेल्या बैठकीनंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. तसेच दुधाचे दर दोन दिवसांत वाढवण्याचा

निर्णय घेण्यात आला असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी मंत्रिगट आणि सुकाणू समिती केंद्र सरकारला भेटणार असल्याचं जाहीर करण्यात आले.

 

सह्याद्रीवर झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला 25 जुलैपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत निकषासह सरसकट कर्जमाफी

मुख्यमंत्र्यांनी 2 तारखेलाच तत्वत:मान्य केल्याची माहिती चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

तसेच आंदोलन काळात ज्या शेतकऱ्यांकडे मुद्देमाल मिळाला नाही त्यांच्या केसेस मागे घेणार असल्याची माहिती देखील चंद्रकांत पाटलांनी दिली.

 

सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांकडून फटाके वाजवत जल्लोष करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number