जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च शनिवारी रात्री मुंबईत दाखल झालाय. मोर्चेकऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. आता हे शेतकरी सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार असून, त्यामुळे सोमवारी मुंबईतील रस्ते जाम होण्याची शक्यता आहे. आपल्या विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी लाल वादळ उठलं आहे. नाशिक ते मुंबई असा प्रवास या लालवादळाने केला आहे. हे लालवादळ सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार आहे.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या :
कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात
शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या
शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या
स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा
वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा